Ad will apear here
Next
उर्दू भाषक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी ‘उर्दू लोकराज्य’चे नियमित वाचन करावे
सोलापूर : ‘शासनाच्या योजना, उपक्रम आणि निर्णयांची माहिती उर्दू भाषिकांना उर्दू लोकराज्य मासिकामुळे त्यांच्या मातृभाषेत मिळण्यास मदत होईल. यासाठी उर्दू भाषक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी ‘उर्दू लोकराज्य’चे नियमित वाचन करावे,’ असे आवाहन शमा उर्दू प्राथमिक शाळेचे अध्यक्ष अय्युब नल्लामंदू यांनी केले. 
सोलापूरचे जिल्हा माहिती कार्यालय आणि शमा प्राथमिक शाळेने चार ऑगस्ट रोजी उर्दू लोकराज्य वाचक मेळावा आयोजित केला होता. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नल्लामंदू बोलत होते. 

‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रत्येक महिन्यात उर्दू लोकराज्य मासिक प्रकाशित केले जाते. लोकराज्य मासिकाच्या नियमित वाचनाने लहान मुलांच्या ज्ञानात भर पडेल,’ असे नल्लामंदू म्हणाले. ‘जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेला उर्दू वाचक मेळावा उपक्रम स्तुत्य आहे,’ असे मत उर्दू मित्र डॉ. वळसंगकर आणि पी. पी. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाला शाळेचे संचालक पी. पी. कुलकर्णी, उर्दू मित्र डॉ. सतीश वळसंगकर, सचिव अबुबकर नल्लामंदू, मजहर अल्लोळी आणि माहिती सहायक एकनाथ पोवार उपस्थित होते.

‘उर्दू लोकराज्य’चे वर्गणीदार म्हणून शमा प्राथमिक शाळेतील ६० विद्यार्थ्यांनी या वेळी नोंदणी केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZUFBF
Similar Posts
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन सोलापूर : ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथील ड्रीम फाउंडेशनचे व्यवस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,
सृजनरंग नियतकालिक स्पर्धेत ‘ऑर्किड ऑरा’ सर्वप्रथम सोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या सृजनरंग व्यावसायिक नियतकालिक स्पर्धेत एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘ऑर्किड ऑरा २०१७’ला सर्वोत्कृष्ट नियतकालिक म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांमधील लेखक चिरंतन रहावा, यासाठी महाविद्यालय
पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाचे दोन हजार कोटी पंढरपूर : ‘शहराच्या विकासासाठी कॅनडा सरकारने आर्थिक साह्य करण्याची घोषणा केली आहे. कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे,’ अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परदेशी शहराच्या धर्तीवर
ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा सोलापूर : बेंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेने सोलापूरमधील ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात एक कार्यशाळा आयोजित केली होती. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे विशाखा परुळेकर व सुमित शिर्के यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language